मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक आदेश देण्याचा सपाटा लावला होता. मात्र राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या आदेशातील हवाच काढून घेतली आहे. राज्य सरकारने मंत्र्यांच्या शेऱ्याला ग्राह्य धरू नये, असे आदेश काढले आहे. त्यामुळे यापुढे मंत्र्यांचे आदेश चालणार नसल्याचे स्पष्ट झाले. यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रहार केला. मुख्यमंत्री नायक सिनेमातील अनिल कपूरच्या भूमिकेत पहायला मिळायचे, असा हल्लाबोल महेश तपासे यावेळी यावेळी केला.
मुख्यमंत्री नायक सिनेमातील अनिल कपूरराज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री नायक सिनेमातील अनिल कपूरच्या भूमिकेत पहायला मिळाले. अनेक कामे फोनवरुन झाली पाहिजेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रशासनाला देत होते. सगळ्या आदेशाचे पालन करताना, अधिकाऱ्यांची तारांबळ उडायची. अनेक आदेश नियमबाह्य, कायद्याच्या कचाट्यात सापडणाऱ्या पत्रांचा, निवेदनाचा यात समावेश असायचा. दुसरीकडे इतर मंत्र्यांकडून लेटरहेडवरील आदेशाचे प्रकार वाढले. राज्य शासनाची यामुळे डोकेदुखी वाढली होती. मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत ही बाब समजून सांगताना, अधिकारी वर्ग मेटाकुटीला यायचा. त्यामुळे राज्य शासनाने याला पायबंद घालण्यासाठी थेट नवे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार कायद्यात बसणाऱ्या आदेशाचे पालन केले जाईल. तसेच नियमबाह्य आदेशाबाबत संबंधित मंत्र्यांना माहिती देण्याची, अशी तरतूद त्यात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी, शासनाच्या नव्या आदेशाचे स्वागत करताना शिंदे सरकारच्या मंत्र्यांकडून प्रशासनात सुरु असलेल्या हस्तक्षेपावर जोरदार टीका केली.