महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदारांनी नाकारलं तर उद्या ते त्यांच्या विरोधातही बोलतील, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - निवडणूक आयोग

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत, निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. तर निवडणूक आयोगाच्या पत्रावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 10:49 PM IST

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईCM Eknath Shinde On Uddhav Thackeray :आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन, निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याचं सांगितलं आहे. त्या पत्रात त्यांनी आम्हाला एक नियम वेगळा आणि भाजपातील मोदी-शहाणा नियम वेगळा असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कर्नाटक निवडणुका प्रचारात केलेलं वक्तव्य आणि मध्य प्रदेशमध्ये अमित शाह यांनी मतदारांना अयोध्यावारी मोफत करून देऊ, असं धर्माच्या नावावरून मत मागण्याचा जो प्रकार केला आहे, त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

उद्धव ठाकरेंना लगावला टोला: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमाशी संवाद साधताना त्यांना या पत्राबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांच्या विरोधात निकाल गेला की, त्यांच्या विरोधात ते बोलत असतात. न्यायालयाच्या विरोधात बोलत असतात, निवडणूक आयोगाने निकाल विरोधात दिला की, त्यांच्या विरोधात बोलत असतात. उद्या जर मतदारानी त्यांना नाकारलं तर ते मतदारांच्या विरोधात ही बोलायला लागतील, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.



अहंकारापेक्षा लोकांची कामे महत्त्वची: नवी मुंबई मेट्रोचं काम उद्यापासून सुरू होणार आहे. यावर देखील टीका केली जात आहे, पण मागच्या अडीच वर्षाच्या काळात स्वतःच्या अहंकारासाठी अनेक कामांची अडवणूक केली गेली. अनेक कामांचे उद्घाटन रखडलं, परंतु आता उद्घाटनापेक्षा लोकांना जर त्यातून सेवा मिळत असतील आणि लोकांची काम होत असतील तर ते अधिक महत्त्वाचं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली.




रेल्वेतील स्वच्छतागृह अधिक स्वच्छ होणार: रेल्वेमधून मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष प्रवास करत असतात. परंतु रेल्वेचे स्वच्छतागृह हे अस्वच्छ असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मी आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि स्वच्छतागृह अधिक कशी स्वच्छता राखता येतील याबाबत त्यांच्याशी चर्चा केली, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तसेच जे सफाई कामगार आहेत, त्यांच्या समस्या कशा मार्गी लागतील यावर सुद्धा तोडगा काढण्यात येणार आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Air Pollution : मुंबईतील रस्ते धुण्यासाठी हजार टँकर्स कामाला; विशेष पथकं तयार, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
  2. Eknath Khadse : तर, माझं विमान कायमचं लॅंड झालं असतं, मुख्यमंत्र्यांशी बोलताना एकनाथ खडसे भावूक
  3. Thackeray vs Shinde : राज्य सरकार घटनाबाह्य, यावरच बुलडोजर फिरवण्याची गरज- खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details