मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आता सुरू झाली ( Mumbai Municipal Election ) आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून आता नवीन रणनीच्या आखल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा ठसा उमटवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या 12 शिलेदारांची निवड केली ( CM Eknath Shinde Appointed 12 Leader s) आहे. या बारा शिलेदारांवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली असून प्रत्येकावर लवकरच विभाग वार जबाबदारी देण्यात येणार आहे.
महापालिका निवडणुकीची यांच्यावर जबाबदारी :खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सदा सर्वणकर, आमदार प्रकाश सुर्वे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार यामिनी जाधव, आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती माजी अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार दिलीप लांडे, माजी नगरसेविका शितल म्हात्रे, माजी नगरसेविका कामिनी शेवाळे, उपनेते आशा मामडी या सर्वांवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकली ( shinde group leaders list for BMC election ) आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना हे एकत्रितरित्या महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे आधीच दोन्ही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आला आहे. खास करून उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापालिकेची सत्ता घेण्यासाठी आखली जात असल्याचे म्हटले जात आहे.