महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 27, 2022, 1:33 PM IST

ETV Bharat / state

Assam Bhavan : महाराष्ट्रात आसाम भवन तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारणार - मुख्यमंत्री

महाराष्ट्रात आसाम भवन तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट ( Maharashtra Bhavan Will Built In Assam  ) केले. रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुख्यमंत्री बिस्वा यांनी शिंदे गटाची आज सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्रात आसाम भवन
asam bhavan

मुंबई :महाराष्ट्र आणि आसाम राज्यामध्ये परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत तसेच या दोन राज्यात उद्योग, व्यापार, पर्यटनात वाढ व्हावी, या विषयावर चर्चा ( Eknath Shinde discussion with Hemanta Biswa Sarma ) झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांच्यात चर्चा करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रात आसाम भवन तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट ( Maharashtra Bhavan Will Built In Assam ) केले. रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुख्यमंत्री बिस्वा यांनी शिंदे गटाची आज सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलत ( CM Eknath Shinde Announcement ) होते.

अनेक पदाधिकारी उपस्थित :राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, समन्वयक आशिष कुलकर्णी, आसाम मंत्रिमंडळातील मंत्री केशव महंत, मंत्री चंद्रमोहन पतवाडी, मंत्री उरखाऊ गोडा ब्रम्हा, मंत्री रंजित कुमार दास, मंत्री डॉ रनुज पेगो, आसाम सरकारचे शिक्षण सल्लागार नानी गोपाल महंता, मंत्री जयंता मलना बरुआ तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते.


एकनाथ शिंदे गुवाहाटी दौऱ्यावर :राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या गुवाहाटी दौऱ्यावर असून त्यांच्यासह आलेले आमदार, खासदार, पदाधिकारी यांची सारी व्यवस्था आसाम सरकारने केली होती. तसेच राज्यात सत्ता स्थापना झाल्यावर पुन्हा एकदा गुवाहाटीला येण्याची विनंती देखील केलेली ( CM Shinde And Assam CM Hemanta Sarma ) होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री सरमा यांनी या सर्वांसाठी खास प्रीतीभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी सरमा यांनी राज्यातील आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटूंबियांची आस्थेने विचारपूस केली. तब्बल दोन तास हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना खास गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच आता एकदा महाराष्ट्राचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी सरमा यांनी नक्की यावे असे सांगून त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही देण्यात आले.



संघर्षाचा काळात 11 दिवस गुवाहाटीमध्ये :मुख्यमंत्र्यांनी सत्ता संघर्षाचा काळात सलग 11 दिवस गुवाहाटीमध्ये होतो. तेव्हा सगळ्यांच्या मनावर प्रचंड दडपण होते. मात्र आता हे दडपण दूर झाले असून तेव्हा ज्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्याच कामाख्या देवीचे आज मुख्यमंत्री बनून पुन्हा दर्शन घेताना एक वेगळेच समाधान मिळाले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आसामच्या मदतीतून उतराई होणे शक्य नसले, तरीही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नवी मुंबईमध्ये आसाम भवन बांधायला शिंदे यांनी होकार दिला. तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आसाम सरकारने जागा देण्यास तयार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी जाहीर केले.



मुख्यमंत्री हेमंता सरमा यांचे कौतूक :आसामचे मुख्यमंत्री हेमंता सरमा यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत अलेल्या 50 आमदारांनी भारत मातेचे नाव अधिक उंचावेल असे काम केले असल्याचे गौरवोद्गार ( Eknath Shinden Appreciate Hemanta Biswa Sarma ) काढले. आपल्या पक्षाची दिशा चुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ती चूक दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांना लागलं ते सर्व सहकार्य आम्ही सरकार म्हणून केले. आज महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने आणि वेगाने काम करत आहे ते पाहून आम्ही केलेली मदत योग्यच होती याची खात्री वाटत असल्याचे मत सरमा यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच औचित्य साधून सत्तासंघर्षाच्या काळात सहाय्य करणाऱ्या आसाम सरकार मधील मंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.



काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल :हेमंत सरमा यांना देखील पडली काय झाडी.. काय डोंगर.. काय हॉटेल..ची भुरळ. काय झाडी.. काय डोंगर.. काय हॉटेल.. या वाक्याची महती सरमा यांचाही कानावर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वेळी आलेली होती. मात्र या भेटीचेनिमित्त साधून आमदार शहाजीबापू पाटील यांनी खुद्द आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांना त्यांचा हा डायलॉग खास आपल्या शैलीत ऐकवला. तो न समजल्यामुळे पुन्हा इंग्रजीमध्ये समजावून देखील सांगितला. या डायलॉग त्यावेळी चांगलाच लोकप्रिय झाल्यामुळे त्याची प्रचंड चर्चा झाली होती. ऋएवढेच नव्हे तर या डायलॉगमुळे महाराष्ट्रातून गुवाहाटीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या देखील प्रचंड वाढल्याचे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details