मुंबई - 'हनीवेलच्या (कंपनी) उद्योग विस्तारातील पावलाचे महाराष्ट्रात स्वागत आहे. यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील.' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. वस्त्रोद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बुटीबोरी येथे उद्योग उभारणीसाठी या कंपनीच्या एका शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
बुटीबोरीत हनीवेल कंपनीच्या वस्त्रोद्योगाला सुविधा दिल्या जातील - मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - maharashtra goverment
हनीवेल ही जागतिक दर्जाची वस्त्र उत्पादक कंपनी आहे. हनीवेल कंपनीला राज्यात आपला उद्योग विस्तार करावयाचा आहे. त्यासाठी हनीवेल इंडियाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उद्योगासाठी बुटीबोरी हे औद्योगिक क्षेत्र उत्तम पर्याय म्हणून पाहीले जात आहे. हा उद्योग बुटीबोरीत उभारला जाऊ शकतो.
हनीवेल ही जागतिक दर्जाची वस्त्र उत्पादक कंपनी आहे. हनीवेल कंपनीला राज्यात आपला उद्योग विस्तार करावयाचा आहे. त्यासाठी हनीवेल इंडियाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उद्योगासाठी बुटीबोरी हे औद्योगिक क्षेत्र उत्तम पर्याय म्हणून पाहिले जात आहे. या ठिकाणी उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्याने उद्योग उभारला जाऊ शकेल, अशी चर्चा शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अनबलगन, ऑरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील आणि हनिवेल आडवान्सड मटेरियलचे संचालक ब्रायन जेम्स लॅसी, उपाध्यक्ष स्टॅसी फॅरेन बर्नर्ड्स, अश्विनी कुमार, निशा गुप्ता व इतर सदस्य उपस्थित होते.