मुंबई- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह पूर्व विदर्भ, मुंबई, कोकणात जोरदार कोसळू लागला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापुरात सुरक्षेच्या कारणास्तव काही गावांतील जनावरांचे, नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची कर्नाटक सरकारला विनंती केली आहे.
अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवा, मुख्यमंत्र्यांची कर्नाटक सरकारला विनंती - अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पाऊस आणि पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी त्यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पाऊस आणि पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी त्यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची विनंती केली आहे. सध्या अलमट्टी धरणाचा विसर्ग १ लाख ७० हजार क्सुसेक वरून २ लाख २० हजार क्सुसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराला अलमट्टी धरण जबाबदार असल्याची टीका होत आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यास धरणाच्या बॅकवॉटरमुळे कृष्णा, वारणा, पंचगंगा यासह इतर छोट्या-मोठ्या नद्यांना पूर येतो असे निष्कर्ष काढले आहेत. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची विनंती केली आहे.