मुंबई - राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्ग काढला आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीतही कामे सुरू असून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिले. विरोधकांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारवर टीका केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार - मुख्यमंत्री
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्ग काढला आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीतही कामे सुरू असून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबई
गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने विरोधकांनी टीका केली, पण या लोकसभेतही जनतेने विरोधकांना उत्तर दिले आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांकडे त्यांचे नेते राहायला का तयार नाहीत? असा सवालही त्यांनी केला. आम्ही सकारात्मक राजकारण करतोय त्यात काही लोक जोडले जात आहेत, आम्ही कोणत्याही नेत्याला गळ घालत नाही, असेही त्यांनी सांगितले.