महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री मातोश्रीवर... - मुंबई

शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस आज रात्री दुसऱ्यांदा मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

मुंबई 1

By

Published : Mar 13, 2019, 2:08 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात युती आणि आघाडीमध्ये थेट सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत.

अर्जुन खोतकर यांच्यासह पालघरच्या जागेवरही चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेसाठी भाजपकडून अंतिम यादी जवळ-जवळ तयार आहे. या यादीवरही चर्चा होणार आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस आज रात्री दुसऱ्यांदा मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत सुधीर मुनगंटीवारही बैठकीला उपस्थित आहेत. ज्या जागांवर समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details