महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यंमत्री दिल्लीत दाखल - cabinate expansion

मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजप शिवसेनेचे जागावाटप आणि पुढचा भाजप प्रदेशाध्यक्ष कोण? या मुद्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 6, 2019, 4:45 PM IST

Updated : Jun 6, 2019, 7:21 PM IST

मुंबई- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे जोरदार वारे वाहत असून भाजप सर्वाधिक आघाडीवर आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहा यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारासह, शिवसेना भाजप जागावाटप आणि सेनेकडून नव्याने मागणी करण्यात आलेल्या लोकसभा उपाध्यक्षपद या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आज (गुरुवार) सायंकाळी दिल्लीला दाखल झाले असून आज रात्री ते अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ताडदेव मिल कंपाऊंड एसआरए प्रकरणी ताशेरे ओढले असून विरोधकांनी मेहता यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. या मुद्यावरही शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या पदासाठी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या देखील नावांची चर्चा होत आहे. लवकरच महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजपच्या विधानसभा जागा वाटपाबाबत तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शहा यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे चर्चिले जात आहे. मात्र, या विस्तारात भाजपच्या नेत्यांना संधी मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

लवकरच काँग्रेसचे विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश होणार असून याच दरम्यान त्यांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी अशा होती, त्यामुळे गेले अनेक महिने मंत्रिमंडळ विस्ताराकडे इच्छुक आमदारांचे लक्ष लागले होते. आता यावर लवकरच निर्णय होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Last Updated : Jun 6, 2019, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details