महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सायबर क्राईम पोलीस ठाणे' ही आजच्या काळाची गरज - मुख्यमंत्री - cyber crime

विदेशात सायबर क्राईमच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असते. त्यामुळे आपल्या राज्यातही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही ते मुख्यमंत्री म्हणाले.

'सायबर क्राईम पोलीस ठाणे' ही आजच्या काळाची गरज - मुख्यमंत्री

By

Published : Jun 15, 2019, 12:01 PM IST

मुंबई -बांद्र्याच्या सायबर क्राइम पोलीस ठाणे आणि उपयुक्त सायबर क्राइम कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा १५ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते पार पडला. सायबर क्राईम पोलीस ठाणे आजच्या काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आणि पोलीस आयुक्त संजय बर्वे हे या कार्यक्रमात उपस्थितीत होते.

'सायबर क्राईम पोलीस ठाणे' ही आजच्या काळाची गरज - मुख्यमंत्री

'सगळं काही डिजिटल होत असताना भविष्य काळात सायबर क्राइमचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे, अत्याधुनिक सोयीचे सायबर क्राइम पोलीस ठाणे सुरू करणे, ही काळाची गरज आहे. विदेशात सायबर क्राईमच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असते. त्यामुळे आपल्या राज्यातही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही ते मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री भूमिपूजन करत असताना

ABOUT THE AUTHOR

...view details