मुंबई- रणजितसिंह मोहिते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर दोघेही भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे आता माढ्याचा विजय निश्चित आहे. हे आधीच ओळखून शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. अपघात होण्यापेक्षा यू-टर्न चांगला असतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. ते रणजितसिंह नाईक यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते.
माढ्यातील पराभव दिसत असल्यानेच पवारांची माघार, मुख्यमंत्र्यांचा टोला
त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे . सदाभाऊ खोत यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहितेपाटील यांच्या विरोधात माढ्यात चंगली लढत दिली . आता तर मोहिते पाटीलच आपल्या सोबत आले आहेत . त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे .
सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला .यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना लक्ष केले. मुख्यमंत्री म्हणाले, की विकासाच्या मुद्यावर तरुण पिढी भाजपकडे आकर्षित होत आहे . त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे . सदाभाऊ खोत यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहितेपाटील यांच्या विरोधात माढ्यात चंगली लढत दिली . आता तर मोहिते पाटीलच आपल्या सोबत आले आहेत . त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे .
ते पुढे म्हणाले, की पवार साहेबांबद्दल मला आदर आहे . पंतप्रधान मोदींनी आधीच सांगितले होते, की पवार साहब को हवा का रुख पता होता है. त्यामुळे अपघात होण्यापेक्षा पवार साहेबांनी यू टर्न घेणे पसंत केले, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी पवारांना लगावला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. माढ्यातून राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने अद्याप त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही.