महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्लाईड क्रास्टो यांचा व्यंगचित्रातून भाजपावर निशाणा - मुंबई बातमी

सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका आणि अश्लील शिवीगाळ किंवा टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली जात असल्याची तक्रार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

clyde-krastos-caricature-targets-bjp
clyde-krastos-caricature-targets-bjp

By

Published : May 4, 2020, 12:53 PM IST

मुंबई- विरोधकांना नामशेष करण्यासाठी भाजपने सोशल मीडियाचा अस्त्र म्हणून वापर केला. मात्र, तेच अस्त्र त्यांच्यावर उलटू लागल्यावर भाजपने आगपाखड सुरू केली. भाजपने तयार केलेले 'सोशल' औषध त्यांनाच आता कडू लागत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे. क्रास्टो यांनी व्यंगचित्रातून भाजपवर जोरदार निशाणाही साधला आहे.

हेही वाचा-पहिला लाभार्थी 'मीच', मद्य मिळवण्यासाठी तळीरामांमध्ये चढाओढ.. मद्यविक्री दुकानांसमोर रांगा

सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका आणि अश्लील शिवीगाळ किंवा टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली जात असल्याची तक्रार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यानंतर भाजपच्या या हास्यास्पद तक्रारीनंतर राजकीय वर्तूळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, याच आगपाखडीवर भाष्य करताना क्लाईड क्रास्टो यांनी भाजपने तयार केलेले 'सोशल' औषध आता त्यांनाच 'कडू' लागत असल्याचे व्यंगचित्र काढून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या वर्तनावर क्लाईड क्रास्टो व्यंगचित्रातून नेहमी प्रहार करत असतात. आजही क्लाईड क्रास्टो यांनी भाजपच्या 'सोशल' औषधावर आपल्या व्यंगचित्रातून फटकारे लगावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details