महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : मंत्रालयातही 'कोरोना'चा धसका, सुरू केली 'स्वच्छता मोहीम' - कोरोना विषाणू

मंत्रालयातील प्रत्येक दालने, सरकते जिने, बसण्यासाठी असलेल्या जागा, त्रिमुर्तीसमोरील मोकळा परिसर आदी ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने रसायने टाकून स्वच्छता केली जात आहे. प्रत्येक मंत्र्यांच्या दालनातही फवारणी करण्यात आली आहे.

Corona virus
मंत्रालयात स्वच्छता मोहीम सुरू

By

Published : Mar 18, 2020, 10:34 AM IST

मुंबई- सोमवारी मंत्रालयात एका अधिकाऱ्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर मंत्रालय प्रशासनाने त्याचा धसका घेतला आहे. मंगळवारी सकाळपासून मंत्रालयातील प्रत्येक दालनात महापालिका कर्मचाऱ्यांना बोलावून रसायनाची फवारणी करण्यापासून ते एकही जागा शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारची खबरदारी घेऊन स्वच्छता केली जात आहे.

मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळपासून आपले अनेक अधिकारी कामाला लावले आहेत. स्वच्छतेत कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, यावर लक्ष देत असल्याची माहिती मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अशोक गायकवाड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

मंत्रालयात स्वच्छता मोहीम सुरू

हेही वाचा -CORONA VIRUS : मुंबईतील ऑर्केस्ट्रा, डिस्कोथेक्स, डान्सबार, पब्स ३१ मार्चपर्यंत बंद

मंत्रालयातील प्रत्येक दालने, सरकते जिने, बसण्यासाठी असलेल्या जागा, त्रिमुर्तीसमोरील मोकळा परिसर आदी ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने रसायने टाकून स्वच्छता केली जात आहे. प्रत्येक मंत्र्यांच्या दालनातही फवारणी करण्यात आली आहे. त्यासोबत येथे असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी पिण्याच्या पाण्याची ठिकाणं, शौचालये येथील नळांवरही रसायने लावून ते स्वच्छ करण्यात आले आहेत.

तर ठिकठिकाणी मंत्रालयात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी विविध प्रकारची रसायने ठेवण्यात आली आहेत. मंत्रालयात सोमवारपासून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यातच मंत्रालयात एक संशयीत रूग्ण आढल्याने अनेक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामाला दांडी मारली असल्याचेही चित्र येथे पहावयास मिळत आहे.

हेही वाचा -गर्दी टाळा.. अतिमहत्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details