मुंबई - शहरात पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेकडून नालेसफाई आणि रस्त्यांची कामे केली जातात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कामांना उशीर झाला असला तरी ही कामे पावसाळ्यापूर्वी निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले. यशवंत जाधव यांनी पूर्व आणि शहर विभागातील रस्ते आणि नाले सफाई कामांची पाहणी केली त्यावेळी त्यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या.
नालेसफाई आणि रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत; स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश - मुंबई पावसाळा
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यांची कामे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने स्थायी समितीचे अध्यक्षयशवंत जाधव यांनी मान्सूनपूर्व कामांना वेग देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला होता. त्याची अंमलबजावणी गांभीर्याने करण्यात येत असून स्थायी समिती अध्यक्षांनी विविध कामांची पाहणी केली.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यांची कामे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने यशवंत जाधव यांनी मान्सूनपूर्व कामांना वेग देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला होता. त्याची अंमलबजावणी गांभीर्याने करण्यात येत असून स्थायी समिती अध्यक्षांनी मुंबई शहरातील वरळीच्या लवग्रोव्ह पंपिंग नाल्यापासून पाहणीला प्रारंभ केला. त्यानंतर रेसकोर्स नाला, माहीम कॉजवे जवळील मिठी नदी, टी. विभागातील बाउंड्री नाला, भांडुपमधील उषा नगर नाला, भांडुप पूर्वमधील एपीआय नाला, एम/पूर्वमधील मानखुर्द नाला, डब्बा कंपाउंड नाला, माहुल क्रीक आदी नाल्यांची पाहणी केली. त्यासोबतच डॉ. अॅनी बेझंट मार्गावरील मेला जंक्शन, वरळीचा आर थडानी मार्ग, वीर सावरकर मार्ग आणि एम/पूर्व विभागातील जीएमएलआर मार्गावरील रस्त्यांच्या कामाची पाहणी जाधव यांनी पाहणी केली.
सद्यस्थितीत आठ ते दहा टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून उर्वरित नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते मोकळे असल्याने रस्त्यांची कामे गतीने (२५ मे पर्यंत) पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, नगरसेवक परमेश्वर कदम, विजेंद्र शिंदे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलू रासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा कक्ष) तथा प्रमुख अभियंता (रस्ते) संजय दराडे, प्रमुख अभियंता संजय जाधव हे उपस्थित होते.