बोरीवलीत नागरिकांनी दाखवले भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांना काळे झेंडे - election
बोरिवली पूर्व येथील रायडोंगरी परिसरात श्री अंबे गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेची इमारत उभी राहिली. मात्र, विकासकाने गेल्या १० वर्षात रहिवाशांच्या नावावर न घर केले ना पार्किंगसाठी जागा दिली.
खासदार गोपाळ शेट्टी यांना दाखवले काळे झेंडे
मुंबई - गेल्या १० वर्षांपासून घराचा प्रश्न सुटत नाही म्हणून नाराज झालेले रहिवाशी काल आक्रमक झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदान करा, असे आव्हान करण्यासाठी आलेल्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार व खासदार गोपाळ शेट्टी यांना काळे झेंडे दाखवून निषेध केल्याचा प्रकार घडला.