मुंबई : मुंबईत एकामागून एक संतापजनक गुन्हे घडत असून ते थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. एका ४२ वर्षीय महिलेवर तिच्या घरात घुसून तीन जणांनी सामूहिक बलात्कार (Gang rape case with woman) केल्याची खळबळजनक ( Gang Rape Case) घटना कुर्ला (Kurla Gang rape case) येथे घडली आहे. पीडितेवर धारदार शस्त्राने वार केले (stabbing victim with sharp weapon) आणि सिगारेटने तिच्या गुप्तांगास चटके (Cigarette burns on womans private parts) दिल्याचे वैद्यकीय तपासात (latest news from Mumba) उघडकीस आल्याचे पोलीस सुत्रांच्या (Mumbai crime) अधिकाऱ्याने सांगितले.
महिलेच्या छातीवर धारदार शस्त्राने वार :ही घटना बुधवारी पहाटे कुर्ला येथे घडली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. आरोपी आणि पीडित महिला एकाच ठिकाणी राहतात. पीडितेवर आरोपींनी एकामागून एक आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी तिच्यावर एकामागून एक बलात्कार तर केलाच शिवाय तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार देखील केला. त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवर सिगारेटचे चटके दिले. त्याचप्रमाणे तिच्या छातीवर आणि दोन्ही हातांवर धारदार शस्त्राने वार केले. एका आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तिला पोलीस ठाण्यात गेल्यास तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी पुढे माहिती पोलिसांनी दिली.