महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीआयडी विभागाची वेबसाईट पूर्वपदावर.. 'हॅक' करून दिली होती सरकारला धमकी - मुंबई हॅकर बातमी

महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी विभागाची वेबसाईट एका अज्ञात सायबर हॅकरकडून हॅक करण्यात आली होती. भारतात मुस्लिमांवरील अत्याचार थांबले नाही तर घातक परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी या वेबसाईटवर नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला देण्यात आली होती.

cid-website-hack-by-unknown-in-mumbai
cid-website-hack-by-unknown-in-mumbai

By

Published : Mar 6, 2020, 11:16 AM IST

मुंबई- महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी विभागाची वेबसाईट एका अज्ञात सायबर हॅकरकडून हॅक करण्यात आली आहे. त्यावरून नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला धमकी देण्यात आली होती. गुरुवार पासून ही वेबसाईट हॅक झाली होती.

हेही वाचा-मुंबईत ७० हजार प्रवांशांची कोरोना चाचणी; ८३ संशयितांपैकी ७५ निगेटिव्ह तर ७ जण अजूनही देखरेखीत

भारतात मुस्लिमांवरील अत्याचार थांबले नाही तर घातक परिणाम भोगावे लागतील अशी धमकी या वेबसाईटवर नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला देण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते तेव्हा झालेल्या हिंसाचाराचा यात उल्लेख करण्यात आला आहे. मुस्लीम सर्वत्र आहेत याचे भान राहू द्या, अशी धमकी यात देण्यात आली होती. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम करून वेबसाईट पूर्वपदावर आणली गेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details