मुंबई -परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता सीआयडीकडून परमबीर सिंह यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस (red corner notice) काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. याबाबत सीआयडीने (गुन्हे अन्वेषण विभाग) केंद्राकडे मागणी केली आहे. सिंह देश सोडून जाऊ नये यासठी ही नोटीस काढण्यात येणार आहे.
सिंह विरोधात अजामीनपात्र वॉरंट
मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमधील खंडणी प्रकरणात मुंबईची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (non bailable warrant issued) काढण्याबाबत मुंबई पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयाला पत्र दिले होते. यावर न्यायालयाने काल (बुधवार) परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आतापर्यंत सिंह यांच्याविरोधात ठाणे आणि गोरेगाव येथील प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट निघाले होते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने जारी केले आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या 20 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंह यांच्याविरोधात दुसरे अजामीनपात्र वॉरंट ठाण्यातील न्यायालयाने जारी केले होते. आता मुंबईमध्ये आणखीन एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच गायब असलेल्या परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी प्रकरणामधील एकूण वॉरंटची संख्या तीनवर पोहचली आहे.
हे ही वाचा -मंत्रिमंडळाच्या पाठिंब्यानंतर नवाब मलिक अजूनच आक्रमक होणार ?