मुंबई -दोन महिन्यापूर्वी चुनाभट्टी येथे बलात्कार झालेल्या तरूणीची मृत्यू सोबतची झुंज अखेर गुरूवारी संपली. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी पक्षाने आज (शुक्रवार) चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर युवतीला न्याय मिळावा आणि नराधमांना पकडण्यात यावे यासाठी मोर्चा काढला होता.
पीडित तरुणीला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज (शुक्रवारी) छगन पेट्रोल पंप (लाल डोंगर) ते चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चाचा काढला होता. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच सर्वसामान्य जनतेनेही यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हेही वाचा... चेंबूर येथे बलात्कार झालेल्या जालन्याच्या 'त्या' पीडितेचा मृत्यू
हेही वाचा... एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 'तिचा' मृत्यू; मात्र आरोपी अद्याप मोकाटच