मुंबई - बॉलिवूडमधील ख्यातनाम नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरोज यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तर उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याने लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
सरोज खान या बॉलिवूड मधील ख्यातनाम नृत्य दिग्दर्शिका आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना त्यांनी आपल्या तालावर नाचवले आहे. माधुरी दीक्षित हिला एक-दो-तीन या गाण्यावर थिरकायला लावणारी नृत्य दिग्दर्शिका अशी त्यांची ओळख आहे. 71 वर्षाच्या सरोज खान यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बॉलिवूड मध्ये काम करणे कमी केले आहे. मात्र, तरी आजही त्यांना काही महत्वाच्या गाण्यासाठी आवर्जून बोलावले जाते. 'कलंक' या सिनेमासाठी पुन्हा एखादा माधुरी दिक्षितला कोरिओग्राफ करण्यासाठी त्याना बोलावण्यात आले होते.
बॉलिवूडमधील ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर - choreographer saroj khan admitted hospital
सरोज खान या बॉलिवूड मधील ख्यातनाम नृत्य दिग्दर्शिका आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना त्यांनी आपल्या तालावर नाचवले आहे. माधुरी दीक्षित हिला एक-दो-तीन या गाण्यावर थिरकायला लावणारी नृत्य दिग्दर्शिका अशी त्यांची ओळख आहे. 71 वर्षाच्या सरोज खान यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बॉलिवूड मध्ये काम करणे कमी केले आहे.
कोरिओग्राफर सरोज खान
श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना त्यांची कोविड टेस्ट देखील करण्यात आली. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांच्यावर बाकी उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने कोणत्याही क्षणी डॉक्टर त्यांना डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे.