मुंबई - हाथरस प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापत आहे. हाथरसनंतर लैंगिक अत्याचार झाल्याच्या अनेकघटना राज्यात समोर आल्या आहेत. आता मुंबईतील गोरेगावमध्ये एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईत पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राज्य सरकारवर टीका केली.
महाराष्ट्रातल्या लेकीबाळी रस्त्यावर पडल्या का?; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - cm uddhav thackeray
देशात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. आरे कॉलनी गोरेगाव येथे ४ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे . चित्रा वाघ यांनी आज पीडीत मुलीच्या वडिलांची भेट घेतली.
देशात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. आरे कॉलनी गोरेगाव येथे 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाले. चित्रा वाघ यांनी आज पीडीत मुलीच्या वडिलांची भेट घेतली. यावेळी वाघ म्हणाल्या, लाज वाटली पाहिजे. रोज महिला, मुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत. महाराष्ट्रातल्या लेकीबाळी काय रस्त्यावर पडल्या आहेत का? मुख्यमंत्री साहेब उत्तर द्या, असा प्रश्न भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला.
ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. यासंदर्भात तक्रार दाखल होताच गोरेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिला आयोगाला अध्यक्ष नाही, कोविड-क्वारंटाइन सेंटरमध्ये वारंवार मागणी करूनही एसओपी (मानक ऑपरेटिंग प्रक्रिया) केलेली नाही. राज्यात दिवसेंदिवस चिमुरड्या मुली, महिलांच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत, याची जबाबदारी कोण व कधी घेणार? असा प्रश्न देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.