महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोपीला एक महिन्यात शिक्षा होईल असा कायदा आणा - चित्रा वाघ - chitra wagh reaction on hinganghat burnt case

आज ती  गेली याचे वाईट वाटतंय, पण महाराष्ट्रात अशा घटनांचा पूर आला आहे. असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

mumbai
आरोपीला एक महिन्यात शिक्षा होईल असा कायदा आणा - चित्रा वाघ

By

Published : Feb 10, 2020, 12:08 PM IST

मुंबई - गेल्या 7 दिवसांपासून हिंगणघाटची पीडित तरूणी मृत्यूशी झुंज देत होती. सोमवारी अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज ती गेली याचे वाईट वाटतंय, पण महाराष्ट्रात अशा घटनांचा पूर आला आहे. असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशा घटनांमध्ये तातडीने आणि एका महिन्यात न्याय मिळवा यासाठी कायदा आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आरोपीला एक महिन्यात शिक्षा होईल असा कायदा आणा - चित्रा वाघ

हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड : अखेर झुंज संपली, आज सकाळी पीडितेचा मृत्यू

त्या म्हणाल्या की, औरंगाबादमध्ये झालेल्या घटनेतील पीडिताचा दुसऱ्या दिवशीच मृत्यू झाला होता. पनवेलच्या घटनेतही पीडितेला जाळून फासावर लटकवले होते. पुण्यातही जीवे मारण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला. राज्यात सध्या काय सुरू आहे, असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ होत असून याला जबाबदार कोण? असाही सवाल त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details