महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला सदस्याला धमकी देणे चुकीचे; चित्रा वाघ यांचा अरविंद सावंतांवर निशाणा - चित्रा वाघ न्यूज

नवनीत राणा कौर यांच्याबरोबर घडलेली घटना अतिशय चुकीचे आहे. एकीकडे आपण महिलांना 50 टक्के जागा राखीव ठेवावा असा प्रस्ताव घेऊन येतो आणि त्यातच लोकसभेच्या एका सदस्यांकडून दुसऱ्या महिला सदस्याला अशाप्रकारे धमकी देणे हे संसदीय लोकशाही पद्धतीला चुकीचे असल्याची भूमिका चित्रा वाघ यांनी स्पष्ट केली आहे.

चित्रा वाघ
चित्रा वाघ

By

Published : Mar 23, 2021, 4:39 PM IST

Updated : Mar 23, 2021, 7:57 PM IST

मुंबई - संसदेमध्ये खासदार नवनीत राणा कौर यांनी सचिन वाझे यांच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ती लोकसभेत टीका केलेली होती. त्यावर ती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नवनीत राणा कौर यांना लोकसभेच्या लॉबीमध्ये मी तुला बघून घेतो, अशी धमकीवजा शब्द बोलले असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. त्यामुळे नवनीत राणा कौर यांनी लोकसभा अध्यक्षांना त्या संदर्भात तक्रार पत्र लिहिलेले आहे. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महिला जनप्रतिनिधींचे अशाप्रकारे खच्चीकरणाचे काम सत्तेतील लोक करत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ यांचा अरविंद सावंतांवर निशाणा

हेही वाचा-एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना घेता येणार कोरोना लस; प्रकाश जावडेकरांची माहिती


महिला नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

आपल्या संपूर्ण संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये विविध पक्षातील महिलांना लोकसभा, राज्यसभा, विधानसभेमध्ये पक्ष पाठवत असतात. परंतू त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आत्ता सध्या सुरू आहे. त्यामुळे याचा सगळ्याच पक्षांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. परंतू नवनीत राणा कौर यांच्याबरोबर घडलेली घटना अतिशय चुकीचे आहे. एकीकडे आपण महिलांना 50 टक्के जागा राखीव ठेवावा असा प्रस्ताव घेऊन येतो आणि त्यातच लोकसभेच्या एका सदस्यांकडून दुसऱ्या महिला सदस्याला अशाप्रकारे धमकी देणे हे संसदीय लोकशाही पद्धतीला चुकीचे असल्याची भूमिका चित्रा वाघ यांनी स्पष्ट केली आहे.

सगळ्या पक्षातल्या लोकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे
आम्ही आमच्या भूमिका मांडायच्या की नाही हा प्रश्न या संपूर्ण प्रकरणांमध्ये उपस्थित होत आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली होती पण आता मी भाजपमध्ये आहे मग मी काही बोलायचे नाही का? जर एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर त्यावर बोलणे टाळावे का? असा सवाल वाघ यांनी केला आहे. त्यामुळे सगळ्या पक्षातल्या लोकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा-परमबीर प्रकरण : काँग्रेस मंत्र्यांची पाच वाजता महत्वाची बैठक

Last Updated : Mar 23, 2021, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details