महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंचपोकळीच्या चिंतामणीचं १०० व्या वर्षात पदार्पण

मंडळाने 1968-69 साली सुवर्ण महोत्सव,  1979-80 साली हिरक महोत्सव तर 1994-95  साली 75 वे वर्षे साजरे कले. यंदा चिंतामणी बाप्पाचं 100 वे वर्ष असून बाप्पाला खास पशुपतीनाथ मंदिरात विराजमान केले आहे. मंदिराचा देखावा पाहण्यासाठी आणि चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचं १०० व्या वर्षात पदार्पण

By

Published : Sep 3, 2019, 1:54 PM IST

मुंबई - चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती मंडळ यंदा 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. मुंबईच्या प्रसिध्द गणपतींपैकी चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती आहे. चिंतामणीच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातून गणेशभक्त येत असतात. मंडळाने यावर्षी पशुपतीनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचं १०० व्या वर्षात पदार्पण

मंडळाने 1968-69 साली सुवर्ण महोत्सव, 1979-80 साली हिरक महोत्सव तर 1994-95 साली 75 वे वर्षे साजरे कले. यंदा चिंतामणी बाप्पाचं 100 वे वर्ष असून बाप्पाला खास पशुपतीनाथ मंदिरात विराजमान केले आहे. मंदिराचा देखावा पाहण्यासाठी आणि चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत.

हे ही वाचा -केंदीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला

चिंतामणी गणपतीची दिवसातून 44 वेळा आरती केली जाते. त्याचप्रमाणे चिंतामणी मंडळाकडून विविध उपक्रम ही 10 दिवस राबवण्यात येतात यामध्ये फोटोग्राफी, खेल,सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच इतर समाज उपयोगी जनजागृतीपर कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत.

चिंचपोकळीच्या चिंतामणीची पूरग्रस्तांना मदत

मुंबईतील मोठ्या गणेश मंडळापैकी एक असणाऱ्या चिंतामणी गणपती मंडळ सामाजिक भानही जपत असते. राज्यातील पूर परिस्थिती पाहून चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 5 लाख रुपयांची मदत केली आहे. शिवाय या आगमन सोहळ्यादरम्यान ठिकठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या होत्या त्यातील जमा झालेला लाखो रुपये मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले आहे.

हे ही वाचा -आज दुपारी समुद्राला मोठी भरती, विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी काळजी घ्यावी

ABOUT THE AUTHOR

...view details