मुंबई - भारत-चीनचा सीमावाद वाढतच आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून आणखीन एक महत्वाचा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या एका अहवलात म्हटले आहे, की भारतात मोबाईल फोन वापरणाऱ्या नागरिकांच्या मोबाईल फोनमध्ये असलेल्या काही चीननिर्मित मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून चीनमधील काही कंपन्या हेरगिरी करू शकतात. या माध्यमातून भारतात सायबर हल्ले होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये चीननिर्मित अॅप्स आहेत काय? अशी होऊ शकते चीनकडून हेरगिरी - भारत चीन संबंध
आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून, भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून ५२ मोबाईल अॅप्लिकेशनच्या संदर्भातील एक अहवाल केंद्र सरकाराच्या संबंधित विभागाला देण्यात आला आहे. या चिनी बनावटीच्या मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून भारतातील मोबाईल धारकांच्या मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा हा सहजासहजी चीनमधील हेरगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व्हरवर कुठल्याही अडथळ्याशिवाय गोळा करता येऊ शकतो.
![सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये चीननिर्मित अॅप्स आहेत काय? अशी होऊ शकते चीनकडून हेरगिरी china may spying china made application india china relations india china disputes china made application banned india china face off भारत चीन झटापट भारत चीन वाद भारत चीन संबंध चीनी वस्तूंवर बहिष्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7679681-1044-7679681-1592547642869.jpg)
आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून, भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून ५२ मोबाईल अॅप्लिकेशनच्या संदर्भातील एक अहवाल केंद्र सरकाराच्या संबंधित विभागाला देण्यात आला आहे. या चिनी बनावटीच्या मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून भारतातील मोबाईल धारकांच्या मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा हा सहजासहजी चीनमधील हेरगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व्हरवर कुठल्याही अडथळ्याशिवाय गोळा करता येऊ शकतो. भारतीय बाजारपेठेत चिनी मोबाईलला मोठी मागणी असून यात चीननिर्मित मोबाईलमध्ये युसी ब्राऊजर, शेअर ईट, टिकटॉकसारखे लोकप्रिय असलेल्या अॅप्लिकेशनचा वापर करण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो गॅलरीसह तुमच्या मोबाईल फोनच्या लोकेशनचा अॅक्सेसची मागणी करते. अॅक्सेसची मागणी दिल्यानंतरच या मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करता येत असल्याने याचा दुरुपयोग भारताच्या विरोधात सायबर हल्ल्यात होऊ शकतो.
कशी होते हेरगिरी -
गुप्तचर यंत्रणांकडून केंद्र सरकारला अशा प्रकारच्या ५२ अॅप्लिकेशनवर बंदी आणण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून भारतातील नागरिकांच्या मोबाईल फोनमधील जतन करून ठेवण्यात आलेल्या आधारकार्डचा तपशील, बँकेच्या संदर्भातील गोपनीय माहिती, तुमच्या मोबाईलवर होणारे संभाषण यासारख्या अनेक गोष्टींचा गैरवापर सध्याच्या परिस्थितीत चिनी कंपन्यांकडून केला जाण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात नागरिकांनीही अशा अॅप्लिकेशनचा वापर करण्याअगोदर सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे सायबर एक्सपर्ट अंकूर पुराणिक यांनी म्हटले आहे.