महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपरच्या पुणे विद्याभवन शाळेत सांताक्लॉज सोबत मुलांची धमाल

लाल रंगाचा वेषात आणि खांद्यावर झोळी घेऊन आलेल्या सांताक्लॉजने मुलांना चॉकलेट, केक देऊन त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणले. तर मुलांनी देखील आपल्या आवडत्या सांताक्लॉजला घरून छान छान खाऊ आणि वस्तू आणून भेट दिल्या.

mumbai
घाटकोपरच्या पुणे विद्याभवन शाळेत सांताक्लॉज सोबत मुलांची धमाल

By

Published : Dec 25, 2019, 9:55 AM IST

मुंबई - सर्वत्र ख्रिसमस उत्साहात साजरा होत आहे. शाळा, कॉलेजमध्ये देखील ख्रिसमस साजरा होत आहे. ख्रिसमसमध्ये लहान मुलांमध्ये सांताक्लॉज आकर्षण असते. मंगळवारी घाटकोपर पूर्वच्या पुणे विद्यार्थी गृहाच्या पुणे विद्याभावन शाळेतील पूर्व प्राथमिक इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील मुलांनी सांताक्लॉजसोबत जिंगल बेल , जिंगल बेल गाण्यावर ताल धरत धमाल केली.

घाटकोपरच्या पुणे विद्याभवन शाळेत सांताक्लॉज सोबत मुलांची धमाल

हेही वाचा -मुंबईतील 'हे' चर्च ठरत आहे नाताळचे खास आकर्षण

शाळेत आज सांताक्लॉज येणार असल्याने ख्रिसमस ट्री आणि रंगीबेरंगी लाईट सभागृहात लावल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यातच शाळेतल्या शिक्षकांनी देखील जिंगल बेलच्या हेअर क्लिप डोक्यावर घालून या धमाल मस्तीत सहभाग घेतला. लाल रंगाचा वेषात आणि खांद्यावर झोळी घेऊन आलेल्या सांताक्लॉजने मुलांना चॉकलेट, केक देऊन त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणले. तर मुलांनी देखील आपल्या आवडत्या सांताक्लॉजला घरून छान छान खाऊ आणि वस्तू आणून भेट दिल्या.

हेही वाचा -बटरफ्लाय नर्सरी स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा

श्रीमती आर. बी. शेलारका गुरुकुल इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका लतीशा युवराज खैरनार या सांताक्लॉज बनून आल्या होत्या. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी गाणे गात ख्रिसमस साजरा केला आणि शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details