मुंबई -वकिलांचे युक्तिवाद, आवारात बसलेले पक्षकार, त्यांच्या आपापसात चालणाऱ्या चर्चा सामान्यपणे असे चित्र न्यायालयाच्या आवारात दिसते. मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात शनिवारी मात्र, वेगळे चित्र पहायला मिळाले. पक्षकारांच्या मुलांसाठी न्यायालयात बालदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कौंटुबिक न्यायालय, मुंबई उपनगर जिल्हा विधी प्राधिकरण, मुंबई वकील संघ आणि मुस्कान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयात बालदिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पक्षकारांच्या मुलांना आमंत्रित करण्यात आले. गाणी, नृत्य, रॅम्प वॉक असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुलांनी सादर केले. यामुळे कौंटुबिक तणावाखाली असणाऱया पालकांच्याही चेहऱ्यावर हास्य आणि आनंदाचे भाव उमटले.