मुंबई - मित्रासोबत सर्व मैत्री दिवस साजरा करतात. मात्र, देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांनी आज झाडांना 'फ्रेण्डशिप बॅण्ड' बांधत अनोखा मैत्री दिवस आज साजरा केला. ग्रीन स्काय फाऊंडेशन आणि साई या संस्थाच्या माध्यमातून भायखळा येथील पालिकेच्या शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईत लहानग्यांनी झाडांसोबत साजरा केला 'फ्रेण्डशीप डे' - मैत्री दिवस
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा जगभरात मैत्री दिवस अर्थात 'फ्रेण्डशिप डे' म्हणून साजरा केला जातो. मात्र, मानावाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणारे झाड देखील आपल्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नाही. याची जाणीव ठेवत मैत्री दिवस साजरा करण्यात आला.

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा जगभरात मैत्रीदिन अर्थात 'फ्रेण्डशिप डे' म्हणून साजरा केला जातो. मात्र, मानावाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणारे झाड देखील आपल्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नाही. याची जाणीव ठेवत मैत्री दिवस साजरा करण्यात आला, असे आयोजकांनी सांगितले.
झाड पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे. झाडांचे संर्वधन झाले पाहिजे. तसेच युवापिढीला झाडाचे महत्त्व कळाले पाहिजे. या हेतूने हा मैत्री दिवस साजरा केला असल्याचे साई संस्थेचे संचालक विनय वस्त यांनी सांगितले. साई संस्था अनेक वर्षांपासून देहविक्री करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांसाठी काम करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.