मुंबई -ईशान्य मुंबईचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांची प्रचार रॅली कांजूरमार्ग पश्चिम येथील म्हाडा वसाहतीत सोमवारी दुपारी काढण्यात आली होती. ही रॅली कांजूरमार्ग पश्चिम म्हाडा वसाहतीत दाखल होताच लहान मुलांनी भिंतीच्या कठड्यावर उभे राहून बहुजन वंचित आघाडीचे नारे दिले. त्यामुळे बहुजन वंचित आघाडी आणि प्रकाश आबेडकर यांच्या आघाडीची दखल घेत रॅली पुढे जात होती.
भाजपच्या प्रचार रॅलीसमोर चिमुकल्यांनी दिले वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचे नारे - भाजप
ईशान्य मुंबईत वंचितचा अजून उघड प्रचार आणि सभा झाल्या नसल्या तरी काही वस्त्यात मात्र प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा मात्र जोरात आहे. त्याचाच प्रत्यक्ष अनुभव सोमवरी भाजपच्या रॅली समोर आला आहे.
राज्यात बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सर्वच जागा लढवत आहेत. लाखोंच्या संख्येने सभा घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन, मुस्लिम आणि इतर समाजातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करत मतदारांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ईशान्य मुंबईतून बहुजन वंचित आघाडीच्यावतीने निहारिका खोंधले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ईशान्य मुंबईत वंचितचा अजून उघड प्रचार आणि सभा झाल्या नसल्या तरी काही वस्त्यात मात्र प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा मात्र जोरात आहे. त्याचाच प्रत्यक्ष अनुभव सोमवरी भाजपच्या रॅली समोर आला आहे.
ही रॅली जात असताना मुलांनी मनोज कोटक, खासदार किरीट सोमय्या, शिवसेना आमदार अशोक पाटील भाऊ कोरगावकर यांच्या समोरच आपल्या घोषणा दिल्या. रॅलीतील सर्व जण स्मित हास्य करीत या मुलांकडे पाहत होते. वंचित बहुजन आघाडीला ईशान्य मुंबईत मानणारा मोठा वर्ग तयार झाला असून त्याचा फटका भाजप आणि काँग्रेस यांना किती प्रमाणात बसतो हे निकालावर अवलंबून आहे. भाजप, काँग्रेस जरी रिपाई आणि इतर गटांचे सहकार्य सोबत आहे असे सांगत असले तरी प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग वंचितकडे आकर्षित झाला आहे.