मुंबई :बालाजी हा १३ वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत प्रवास करत होता. पुण्यावरून मुंबईला ही ट्रेन निघाली होती . ट्रेनमध्ये ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणची खिडकी आणि दरवाजा हा उघडा होता . ट्रेनने पुणे स्टेशन सोडल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी बाहेरून दगड फेकण्यात आल्यामुळे बालाजीच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. दगडफेक करणाऱ्यांनी इतक्या वेगाने दगडफेक केला की दगड लागल पर्यंत त्या बालकाला कळले नाही की दगड फेकता आहेत आणि आपण स्वतःला वाचवले पाहिजे.
बालकाच्या संदर्भात माहिती : रेल्वे मदत केंद्राला 149 क्रमांकावरनं तातडीने याबाबत सूचना मिळाल्यानंतर त्यांनी कार्यवाही सुरू केली.तक्रार मिळाल्यानंतर रेल्वेने तातडीने लोणावळा येथे जखमीवर प्राथमिक उपचार केले आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे वैद्यकीय पथकानेही जखमीवर उपचार केले. जखमी बालकावर डॉक्टरांनी त्वरित योग्य ते उपचार केल्यामुळे त्याचा जीव बचावला. मात्र रेल्वे मधील आज एका प्रवाशाने रेल्वेला संपर्क करून या बालकाच्या संदर्भात माहिती दिल्यामुळे हे शक्य झाले.