नाल्यामध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू, मुंबईतील घाटकोपरची घटना - mumbai nala incident
घाटकोपर पूर्व येथे पंत नगर पोलीस ठाणे आहे. त्यासमोर सावित्रीबाई फुले नगर आहे. या ठिकाणी राहणारा हुसेन हमीद शेख आपल्या भावासोबत खेळत असताना वसाहतीच्या बाजूच्या नाल्यात दुपारी पडला.
मुंबई - घाटकोपर पूर्व येथील सावित्रीबाई फुले नगर येथे गुरुवारी दुपारी पाच वर्षांचा हमीद शेख नाल्यात पडला होता. शुक्रवारी शोधकार्यादरम्यान हमीद मृतावस्थेत आढळून आला. अग्निशमन दलाकडून गुरुवारी युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू होते. मात्र, संध्याकाळपर्यंत त्याचा शोध लागला नाही. अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. शुक्रवारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. यावेळी हमीद स्थानिकांच्या हाती लागला. स्थानिकांनी राजावाडी रुग्णालयात नेला असता, त्यास मृत घोषित करण्यात आले.