मुंबई : आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा तुम्ही वरळीतून येऊन दाखवा असे आव्हान दिले होते. त्यावेळी हा एकनाथ शिंदे एकटा आला होता. आणि हेलिकॉप्टरने नाही तर बाय रोड मी गेलो होतो असे म्हणत आपल्या नादी कुणी लागू शकत नाही असा गर्भित इशाराच शिंदे यांनी यावेळी दिला आहे. तसेच, मी अशी छोटी नव्हे तर फक्त मोठी आव्हानं स्वीकारत आलो आहे. त्याचबरोबर अशी आव्हाने स्वीकारतच मी इथपर्यंत आलो आहे. माझा खडतर संघर्ष मला इथपर्यंत घेऊन आला आहे असही शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
तुम्ही कोणाला आव्हान देता: आम्ही सुरुवातीच्या काळात मेहनत केलेली आहे. शाखाप्रमुखापासून मी काम केलेले आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत आलो आहोत. आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे तुम्ही कोणाला आव्हान देता. ही आव्हानं पेलत पेलतंच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत असे म्हणत आम्ही लोकांच्या मनातील सरकारची स्थापना केलेली आहे असा दावा शिंदे यांनी यावेळी केला आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन निवडणुकीला सामोर जाण्याचे आव्हान दिलं होतं.
मी मोठी-मोठी आव्हाने स्वीकारतो : सध्या काही लोक सकाळी उठले की फक्त गद्दार आणि खोके असे शब्द आमच्याबद्दल वापरतात. या शब्दांशिवाय त्यांच्याकडे काहीही राहिलेले नाही. मी असल्या गोष्टींवर भाष्य करत नाही तर मी माझ्या कामाने उत्तर देत असतो असही शिंदे यावेळी म्हणाले आहेत. त्याच्यावर भाष्य करत नाहीत. काही लोक आव्हान देत आहेत. त्यावर माझ्या सहकाऱ्यांनी अगोदरच सांगितलेले आहे की, एकनाथ शिंदे छोटी आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी-मोठी आव्हाने स्वीकारतो. मी असेच मोठे आव्हान सहा महिन्यांपूर्वी स्वीकारले असे म्हणत शिंदे यांनी आपल्या बंडाची आठवण करून दिली आहे.
मीही मासेविक्री केली :कोळी समाज हा जीवाला जीव देणारा आहे. समुद्रांच्या लाटांशी सामना करणारा कोळी समाज हा इथला मूळनिवासी आहे. मी कोळी नसलो तरी या व्यवसायाशी माझं जवळचं नातं आहे. मी मासेविक्रीचा व्यवसाय पूर्वी केलेला आहे. त्यामुळे या समाजाची माहिती आहे. प्रेम देणाऱ्याला दुप्पट प्रेम देणारा हा कोळी समाज आहे असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी कोळी समाजाचे कौतूक केले आहे. तसेच, पूर्वी ६० फूट अंतराने काम होणार होतं. परंतु बोटींना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हे अंतर १२० फूट ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला असे म्हत मागच्या सरकारला सामान्यांच्या प्रश्नांचं देणंघेणं नव्हतं असही शिंदे म्हणाले आहेत.
हेही वाचा :मोहन भागवतांकडे विज्ञानाचे ज्ञान कमी; स्वामी निश्चलानंद यांचे विधान