महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यानी घेतला मुंबईमधील कोरोना परिस्थितीचा आढावा - Corona Review Mumbai Chief Minister Uddhav Thackeray

राज्यासह मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईमधील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

Corona Review Mumbai cm Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Apr 12, 2021, 6:22 PM IST

मुंबई - राज्यासह मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईमधील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

हेही वाचा -"विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही"

मुंबईतील रुग्णांची संख्या, बेडची संख्या, नव्याने उभारण्यात येणारे कोविड सेंटर, औषधांचा साठा आणि केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची आयुक्त चहल यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीपूर्वी पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाची बैठकही घेतली.

हेही वाचा -लोकांची काळजी घेणार, कुणालाही वार्‍यावर सोडणार नाही - नवाब मलिक

ABOUT THE AUTHOR

...view details