महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली - Tribute to dr. Lokhande cm uddhav

आंबेडकरी, दलित आणि बौद्ध विचार चळवळींचे भाष्यकार म्हणून त्यांनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभ्यासू मांडणी केली आहे. डॉ. लोखंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Sep 22, 2020, 3:04 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना वाहिली.

शोकसंदेशात, डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाङ् मय यांच्या संशोधन-लेखनातून अभ्यासक म्हणून मोठे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्य संघासह अनेक संस्था, संघटनांच्या माध्यमातून ते साहित्य-संस्कृती क्षेत्रात सक्रिय होते. आंबेडकरी, दलित आणि बौद्ध विचार चळवळींचे भाष्यकार म्हणून त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभ्यासू मांडणी केली आहे. डॉ. लोखंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

हेही वाचा-'उपसभापतींचे चुकलेच', शरद पवारांचे मत; निलंबित खासदारांच्या समर्थनार्थ करणार लाक्षणिक अन्नत्याग

ABOUT THE AUTHOR

...view details