महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 1, 2020, 8:56 PM IST

Updated : Sep 3, 2020, 4:00 PM IST

ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली

शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे. शिवाचार्य महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले.

शिवलिंग शिवाचार्य महाराज
शिवलिंग शिवाचार्य महाराज

मुंबई- धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मूर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंगायत धर्मगुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली.

वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले. विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे. शिवाचार्य महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले.

हेही वाचा-मध्य रेल्वेची राज्यात आंतरजिल्हा रेल्वे प्रवासाला परवानगी, उद्यापासून बुकिंगला सुरुवात

Last Updated : Sep 3, 2020, 4:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details