महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तारापूर स्फोटाची सखोल चौकशी करा' मुख्यमत्र्यांनी दिला आदेश - तारापूर स्फोट

काल(13 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी याविषयी चर्चा  केली आहे. यावेळी त्यांनी औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा घटना घडणार नाहीत यादृष्टीने कठोर पावले उचलावीत असे निर्देश दिले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 14, 2020, 5:50 AM IST

मुंबई - तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी प्रधान सचिव कामगार करणार आहेत.

हेही वाचा -तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

काल(13 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी याविषयी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा घटना घडणार नाहीत यादृष्टीने कठोर पावले उचलावीत असे निर्देश दिले आहेत. तारापूर पूर्वी डोंबिवली येथे प्रोबेस कंपनीत स्फोटाची घटना घडली होती. अशा स्वरूपाच्या घटना घडून औद्योगिक सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून, सर्वच धोकादायक वर्गातील उद्योगांची तपासणी करण्यात येणार आहे. उद्योग व त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्फत कंपन्यांचे सेफ्टी ऑडीट करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details