महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना "निसर्ग" प्रमाणे देणार नुकसान भरपाई'

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : May 25, 2021, 9:14 PM IST

मुंबई - गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 25 मे) केली आहे.

रक्कम अद्याप घोषित नाही

मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता. तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही, असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज (दि. 25 मे) ही घोषणा केली. मात्र, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेचा आकडा घोषित केलेला नाही. मात्र, निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानाचे निकष लावून नुकसानग्रस्तांना मदत केली जाण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी 21 मे रोजी केली होती पाहणी

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई, कोकण किनारपट्टीसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नुकसान झाल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्या पाहणीनंतर लवकरच पंचनामे पूर्ण करून राज्य सरकारकडून मदत घोषित केली जाणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

निसर्ग चक्रीवादळानंतरे केली होती 'इतकी' मदत

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रायगडसाठी शंभर कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 75 कोटी रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपये तातडीने मंजूर करून दिले होते.

हेही वाचा -रेल्वेच्या कर्मचार्‍यांचा फ्रंटलाइन वर्करमध्ये समावेश करा; राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details