मुंबई :महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता चित्रपट, मालिका निर्मात्यांसमवेत बैठक बोलावली आहे. तर दुपारी 1 वाजता प्रमुख उद्योजकांसमवेत बैठक होणार आहे.
ही बैठक ऑनलाईन होणार आहे. या बैठकीत मिनी लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत नक्की काय चर्चा होणार? याकडे लक्ष लागले आहे.
लोकल, बस प्रवासावर येणार निर्बंध?
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वाढत्या संक्रमणामुळे चिंतेची परिस्थिती उद्भवली आहे.नागरिकांकडून शासनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा लोकल, बस प्रवासावर निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या रविवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही नियमावली लागू करण्याची शक्यता आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली.