महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक'

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील खटले मागे घेण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यासोबतच, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल असूनही कारवाई  झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

cong
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड

By

Published : Dec 11, 2019, 7:25 PM IST

Updated : Dec 11, 2019, 8:06 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व खटले मागे घेण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे. आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेतली, त्याप्रसंगी ते माध्यमांसोबत बोलत होते.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड

हेही वाचा -भिमा-कोरेगावसह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा निदर्शने

तसेच, कोरेगाव भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल असूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंजाब बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्यासाठी केंद्राने त्यांचे पैसे द्यावेत; अथवा ही बँक इतर बँकेत विलीन करावी आणि यातून मार्ग काढावा, अशी मागणी केल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आहे.

Last Updated : Dec 11, 2019, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details