मुंबई : कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 10 मेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर होईल. प्रचारासाठी अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कर्नाटकात बाजी मारण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. महाराष्ट्रातून भाजपच्या 60 पदाधिकाऱ्यांना प्रचाराच्या कामाला जुंपले आहे. भाजपच्या मदतीला आता शिवसेना शिंदे गटही उतरणार आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतः या प्रचाराला जाणार आहेत. आजपासून तीन दिवसांचा दौरा असून या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Eknath Shinde : मराठी बहुभाषिकांच्या जखमेवर मुख्यमंत्री चोळणार मीठ, कर्नाटकात करणार भाजपचा प्रचार - एकनाथ शिंदे कर्नाटक दौऱ्यावर
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळला असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून तीन दिवस कर्नाटकात भाजपच्या प्रचारासाठी जाणार आहेत. दरम्यान, केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या रोड शो मध्ये सहभागी होऊन, कर्नाटकातील मराठी बहुलभागातील भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळणार आहेत.
![Eknath Shinde : मराठी बहुभाषिकांच्या जखमेवर मुख्यमंत्री चोळणार मीठ, कर्नाटकात करणार भाजपचा प्रचार Eknath Shinde](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/1200-675-18436496-thumbnail-16x9-eknathshinde.jpg)
असा असेल दौरा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 8 वाजता मुंबई विमानतळावरुन कर्नाटक दौऱ्यासाठी निघतील. रात्री साडेनऊ वाजता बंगळूर येथे आगमन होईल. रविवारी सकाळी साडेआठ ते 8 वाजेपर्यंत बंगळूर येथील कबोन पार्क येथील मतदार संघात पायी प्रचार करतील. साडेनऊ ते साडे दहा या एका तासात बंगळुरमधील डोड्डागणपती मंदिरात गणेशाची पूजा आणि दर्शन करतील. दुपारी 4 वाजता ते 7 वाजेपर्यंत चांदपुरा सर्कल ते इग्गालुरू हासून मेन रोडवर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत रोड शोमध्ये सहभागी होतील. रात्री आठ वाजता बंगळुरू विमान तळावरून मंगळूरकडे निघतील. सोमवारी 8 मे रोजी सकाळी नऊ वाजून 40 मिनिटे ते 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतील. दरम्यान, धर्म स्थळ संस्थांचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांची भेट घेतील. दुपारी 11 वाजता धर्मस्थळ येथून हेलिकॉप्टर उड्डपी कडे रवाना होतील. दुपारी साडेबारा वाजता श्रीकृष्ण मंदीरात पूजा आणि दर्शन करतील. दुपारी साडेतीन ते चार वाजेपर्यंत उडपी जिल्ह्यातील कापू विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांचा प्रचार करतील. दुपारी चार चे पाच रोड शो आणि संध्याकाळी 5 नंतर प्रचार संपवून मंगळुरुला रवाना होतील. रात्री नऊ नंतर मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. रात्री 10 वाजता मुंबई विमानतळावरुन वर्षा निवासस्थानी पोहचतील.
एकीकरण समितीच्या प्रचाराकडे पाठ :महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वाद पेटला होता. कर्नाटकातील मराठी बहुभाषिकांची महाराष्ट्र एकीकरण समिती विधानसभेच्या रिंगणात उतरली आहे. निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी एकीकरण समितीला पाठिंबा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात भाजपच्या प्रचारासाठी तीन दिवस जाणार आहेत. कर्नाटकातील मराठी बहुभाषिकांनी त्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या साठ वर्षांपासून सीमा भागाचा लढा देत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, असा संताप व्यक्त केला जातो आहे.
|