मुंबई :राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने मुंबईत, प्रभादेवी येथील रवींद्रनाथ नाट्य मंदिरात युवाशक्ती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सुद्धा उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, जे पी म्हणजे, 'जबान के पक्के', असे सांगत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच युवाशक्तीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय म्हणून संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
'जबान के पक्के' :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे. पी. नड्डा यांच्याविषयी बोलताना सांगितले, तुमच्या नावात जे. पी. आहे. म्हणजेच तुम्ही 'जबान के पक्के' आहात असे म्हणत शिंदे यांनी नड्डा यांच्याविषयी आदर व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील युवा पिढीची ताकद ओळखली असून युवा पिढीसाठी ते सातत्याने काम करत आहेत. भविष्यात हा देश युवकांवरच चालणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी अशा पद्धतीची युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिर मोलाची भूमिका बजावतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
२ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, येत्या काळात तब्बल ३ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष आहे. सध्याच्या काळात अनेक देशांची आर्थिक व्यवस्था ढासळत असताना आपण जी २० चे अध्यक्ष पद भूषवितो आहोत. देशाचे भविष्य याच युवा पिढीच्या हातात आहे. राज्यात आयोजित होणाऱ्या शिबिरांमधून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार कसा मिळेल हेच सरकारचे लक्ष्य असून आतापर्यंत २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. तर एकाचवेळी ७५ हजार नोकऱ्या देण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे.
मंत्रीउत्तम दर्जाचे शिक्षण :कमी पैशात विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी आम्ही काम करत आहोत. शिक्षण देण्यासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. पालिकेच्या शाळांमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यासाठी विविध पातळ्यांवर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. शिबिरात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध स्टार्टअप तसेच व्यवसाय मार्गदर्शन विषयातील स्टॉल, शैक्षणिक कर्ज पुरविणाऱ्या बँकांचे स्टॉल, पुस्तकांचे व्यवसाय मार्गदर्शन विषयावरील प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
- Tulja Bhavani Temple News : अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई
- SC verdict on Jallikattu bullock cart: हुर्रे.. बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी, शर्यती घेण्याचा मार्ग मोकळा
- Law Minister of country: किरेन रिजीजू यांना कायदेमंत्री पदावरून हटविले; अर्जुन मेघवाल देशाचे नवे कायदा