मुंबई :राज्यभरात शासकीय निमशासकीय महापालिका आरोग्य तसेच शिक्षक शिक्षण इतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे. मात्र राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेत संदर्भात सकारात्मक असून संप करणे इतपत तातडीचा प्रश्न नव्हता. संपकरांनी चर्चेची तयारी ठेवायला हवी. त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. त्यांनी संघर्ष टाळायला हवा असे, आम्ही सातत्याने सांगत आहोत. असे मुख्यमंत्री म्हणाले ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
डॉक्टर दीपक सावंत यांचा पक्षप्रवेश :माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते डॉक्टर दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दीपक सावंत यांचा प्रवेश हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. केवळ आरोग्य विषयक काम करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलो आहो.त बाकी कोणताही उद्देश नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेत आपल्याला गेल्या तीन वर्षात कोणतेही काम दिले गेले नाही, जबाबदारी दिली नाही, त्यामुळे आपली घुसमट होत होती, म्हणून आपण बाहेर पडलो असल्याचे त्यांनी सांगितले.