नवी मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) हे केवळ रबर स्टॅम्प आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ), अमित शहांच्या ( Amit Shah ) पुढे ते बोलू शकत नाहीत अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण ( Vidya Chavan women state president of NCP ) यांनी केली आहे. समृद्धी महामार्गाच्या उदघाट्न प्रसंगी मोदी आले असता शिंदे फडणवीस ( Vidya Chavan Criticizes Shinde Government ) बेळगाव प्रश्नावर का बोलले नाही? आमच्या महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ देऊ नका अशी विनंती देखील त्यांनी केली.
नितेश राणेला म्हणाल्या तीन फुटाचा आमदार -बेळगावातील मराठी माणसांना न्याय द्या. शिंदे फडणवीसांच्या पाठीवरून मोदींनी हाथ फिरवला की, ते एकदम नमून गेले असे देखील चव्हाण म्हणाल्या. विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला आघाडीची सध्या महागाईविरोधात जनजागर यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान नवी मुंबईत आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान चव्हाण यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ‘दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो. अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात, याचा विचार करा,’ असे चव्हाण म्हणाल्या.