महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde In Delhi : आमच्याकडे १२ नव्हे १८ खासदार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत गौप्यस्फोट

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींनी ( Political events in Maharashtra ) पुन्हा एकदा वेग घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) रात्री दीड वाजता राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. राजधानी दिल्लीत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अद्याप राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारबाबत ते भाजप नेत्यांशी चर्चा करतील, असे म्हटले जात आहे.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

By

Published : Jul 19, 2022, 7:02 AM IST

Updated : Jul 19, 2022, 8:20 AM IST

मुंबई - शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत. आज (मंगळवार) दिल्लीत शिवसेनेचे 12 खासदार ( MP of Shiv Sena ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना समर्थन घोषित करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) दिल्लीत दाखल झाले आहेत. रात्री अकराच्या सुमारास ते विमानाने दिल्लीला निघाले व दीड वाजता दिल्लीत पोहोचले. मंत्रिमंडळ विस्ताराचाही विषय अद्याप प्रलंबित आहे. भारतीय जनता पक्षाच्या ( Bjp ) ज्येष्ठ नेत्यांची ते मुख्यमंत्री भेट घेण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मध्यरात्रीनंतर दाखल झाले. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेचे खासदार आम्हाला भेटतील. आमच्याकडे 12 नव्हे तर 18 खासदार आहेत. आमचा आमच्या न्यायव्यवस्थेवर अढळ विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, असे त्यांनी सांगितले.

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे राजधानीत दाखल

मंत्रिमंडळ विस्तार आणि खासदारांचा वेगळा गट -यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गृहमंत्री अमित शहा ( Home Minister Amit Shah ) किंवा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ( JP Nadda ) यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच आज झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत ( Presidential Election ) शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु ( Draupadi Murmu ) यांना पाठिंबा जाहीर केला होता. द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्यात यावा यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर दबाव बनवला होता. खासदार राहुल शेवाळे, खासदार राजेंद्र गावित यांनी तर याबाबतचा पत्रच उद्धव ठाकरे यांना देऊन आपली भूमिका निवडणुकीआधीच स्पष्ट केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या 12 खासदारांचा एक गट मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. आज त्याबाबत अधिकृत घोषणाही होण्याची शक्यता आहे.

त्या खासदारांवर कारवाईचे संकेत - सोमवारीसायंकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे खासदार शिवसेनेसोबत असल्याचेच सांगितले. मात्र, शिवसेनेच्या कोणत्याही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांना पाठिंबा दर्शवला तर त्यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात असंवैधानिक मार्गाने सरकार आणले आहे. त्यामुळे 20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी दरम्यान न्यायालय योग्य तो न्याय करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ओबीसी आरक्षणाबाबत विचारविनीमय - दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, दिल्लीत आपण ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीत आलो आहोत. राज्यातील ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासंदर्भात आपण वकिलांशी चर्चा करणार आहोत.

हेही वाचा - Eknath Shinde :शिंदे गटाने केली शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर

Last Updated : Jul 19, 2022, 8:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details