मुंबई:गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ( Maharashtra Karnataka Border Dispute ) पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( CM Bommai ) रोज नवनवीन विधाने करून वाद वाढवत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावर का बोलत नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. यादरम्यान, आज मुख्यमंत्री शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि मुख्यमंत्री बोम्मईंमध्ये ( CM Bommai ) गुजरातमध्ये भेट झाली. दरम्यान, महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादाच्या प्रश्नांवर गुप्तगू झाल्याचे समजते.
Border Dispute : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री बोम्मई यांची सीमाप्रश्नी भेट? - मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल
कर्नाटकचे बसवराज बोम्मई यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करावे, अशी मागणी जोर धरू लागली असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंमध्ये ( CM Bommai ) गुजरातमध्ये भेट झाली. दरम्यान, महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादाच्या प्रश्नांवर गुप्तगू झाल्याचे समजते.
गुजरात विमानतळावर भेट: गुजरातचे नवे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला ( CM Bhupendra Patel swearing ceremony ) महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. शपथविधीनंतर आपआपल्या राज्यात परतत असताना मुख्यमंत्री शिंदे आणि बोम्मई यांची विमानतळाच्या विशेष कक्षात भेट झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते, अशी माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीतील चर्चा?कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, जत जिल्ह्यातील गावांवर दावा केल्यानंतर सतत वादग्रस्त विधाने करत राहिल्याने सीमावाद चिघळला आहे. कर्नाटकातील वेदिके संघटनेने तीव्र आंदोलन करत महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केली. महाराष्ट्रात या निषेधार्थ कर्नाटक मधील गाड्यांना काळे फासण्यात आले. कर्नाटकमधील मुख्यमंत्री चितावणी खोर वक्तव्य करत असताना महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य करण्यास टाळले. विरोधकांनी राज्य सरकारला यावरून धारेवर धरत मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात झालेल्या भेटीत किमान पंधरा मिनिटं दोघांमध्ये गुप्तागु झाली असून दोघांमधील संवाद अद्याप समोर आलेले नाही.