मुंबई:छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) मुंबई या ठिकाणी दोन दिवसापूर्वी ईटीव्ही भारत वतीने तेथील प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेतली होती. शासनाच्या आदेशा नंतरही कोणतेही कोविड प्रोटोकॉल किंवा चाचण्या सुरू केल्या नव्हते. मात्र आता विमानतळ प्राधिकरणाने केंद्रीय आरोग्य मंत्री मानसुख मांडवीय यांच्या आदेशानंतर कोविड प्रोटोकॉल आणि चाचण्या घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. 24 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी (International Airport) आरटीपीसीआर चाचण्या सुरू केल्या आहेत. (RTPCR Test) मात्र एकूण प्रवाश्यापैकी 2 टक्केच प्रवासी व्यक्तींची चाचणी केली जाईल. याबाबत मात्र वैद्यकीय क्षेत्रातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दररोज आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या 39 ते 40 हजार दरम्यान तर 800 पेक्षा अधिक विमानांची उड्डाणे होतात. त्यामुळे खबरदारी अधिक घेणे जरुरी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ: मुंबई या ठिकाणी 12 डिसेंबर 2022 रोजी एकाच दिवशी एक लाख 50 हजार 988 प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवाशांची संख्या 39,517 इतकी होती तर राष्ट्रीय प्रवासी संख्या 1,11,441 इतकी होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई यांच्या आजच्या माहितीनुसार त्यांच्याकडे आजची सांख्यिकी नव्हती. मात्र त्यांच्या आधारानुसार मागील काही दिवसात आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या 39 हजार ते 40 हजार इतकी आहे. दररोज आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या 39 ते 40 हजार दरम्यान तर 800 पेक्षा अधिक विमानांची उड्डाणे होतात. विमानतळ प्राधिकरणद्वारे एकूण प्रवाश्यापैकी केवळ 2 टक्केच आंतरराष्ट्रीय प्रवासी व्यक्तींची चाचणी केली जाणार आहे. या चाचणी निर्णय बाबत डॉक्टरांनी सवाल उपस्थित केला आहे.