मुंबई : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहीर स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख गड किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे प्रयोग राज्यभर होणार आहे. तसेच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महारांजाचे आंतराष्ट्रीय केंद्र साकारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचा आयोजन :राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार भरत गोगावले प्रशांत, ठाकूर महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे त्यासोबत राज्याचे मुख्य सचिव, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश मस्के तसेच शिवराज्याभिषेक समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
इतिहासाचे साक्षीदार व्हा :सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व शिवभक्तांकरिता पाणी, भोजन, मंडप, आरोग्य सुविधांच योग्य प्रकारचे नियोजन करावे. कोणत्याही प्रकारची गर्ल्स होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. रायगडावरती पूर्णपणे विद्युत रोषणाई करण्यात यावी. राज्य, केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाशी समन्वय ठेवावा. कोणत्या प्रकारची अडचण येऊ देऊ नये अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सोहळा दिनी येणाऱ्या शिवभक्तांकर्ता महाड ते पाचाड दरम्यान मोफत बस सेवा सुरू करावी असे निर्देश त्यांनी दिले. सोहळ्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा. तसेच सर्वांनी इतिहासाचे साक्षीदार बना आशा प्रकारचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले आहे.