मुंबई - राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाला महान शिवभक्त आणि स्वराज्याचे आरमार प्रमुख 'सरखेल कान्होजी आंग्रेंचे' नाव द्यावे, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजेंनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रेंचे नाव द्या, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांसह गडकरींना पत्र - मुंबई - गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रेंचे नाव द्या
मुंबई - गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रेंचे नाव द्यावे, असी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे
महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम शिवभक्तांच्या तसेच इतिहास प्रेमींच्या मनातली ही मागणी असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमची मागणी पूर्ण करेल असा विश्वास आहे. कोकणच्या या सुपुत्राची दखल साऱ्या जगाने घेणं गरजेचं असल्याचे संभाजीराजे म्हणाले.