महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chhatrapati Sambhaji Raje : इतिहासाची मोडतोड! संभाजी राजांचा चित्रपट निर्मात्यांना इशारा, राष्ट्रवादीचा देखील पाठिंबा - Chhatrapati Sambhaji Raje

चित्रपट लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करून चित्रपट तयार करणे खपवून घेतले जाणार नाही आसा थेट इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी दिग्दर्शक आणि निर्मातांना दिला ( Chhatrapati Sambhaji Rajen warn filmmaker and director ) आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट ( Jitendra Awhad Tweet ) करत छत्रपती संभाजी राजे यांच्या या भूमिकेतला पाठिंबा दर्शवला

Chhatrapati Sambhaji Raje
इतिहासाची मोडतोड

By

Published : Nov 7, 2022, 10:01 AM IST

मुंबई :चित्रपट लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत. मात्र यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही आसा थेट इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी दिग्दर्शक आणि निर्मातांना दिला ( Chhatrapati Sambhaji Rajen warn filmmaker and director ) आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील पाठिंबा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट ( Jitendra Awhad Tweet ) करत छत्रपती संभाजी राजे यांच्या या भूमिकेतला पाठिंबा दर्शवला असून, पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे यांच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

जितेंद्र आव्हाड ट्विट

छत्रपती संभाजी राजेंना पाठिंबा :राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट सेलकडून देखील छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास सांगण्याची परंपरा बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून सुरू झाली. तीच परंपरा आता चित्रपट सृष्टीत काहीजण करत आहेत. याचा आम्ही विरोध करत राहू, आता या विरोधाला छत्रपती संभाजी राजे ( Chhatrapati Shivaji Maharaj Film ) यांच्या नावाने एक आवाज मिळाला असल्याचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे :नुकतेच प्रदर्शित झालेला चित्रपट "हर हर महादेव" आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलेला चित्रपट "वेडात वीर मराठे दौडले सात" या चित्रपटांवर छत्रपती संभाजी राजे यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपट लिबर्टीच्या नावाखाली विकृत सिनेमे काढले जात आहेत. यातून चुकीचा इतिहास लोकांपुढे मांडला जात आहे. या आधीही असे झाले आहे. मात्र आता यापुढे हे चालणार नाही असा इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी निर्माता आणि दिग्दर्शकांना दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details