मुंबई - काल संपूर्ण राज्यभरात प्रशासनाने नवीन कोरोना निर्बंध लावले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील विविध भाजी मार्केटमध्ये तुरळक प्रमाणात गर्दी ही पाहायला मिळाली. परंतु, दादरच्या भाजी मार्केट परिसरात आजही लोकांची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली होती. मुंबईमध्ये चेंबूर हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट भाग आहे. पालिकेने त्या परिसरातील बाजारपेठेमध्ये नियंत्रण आणून गर्दी नियंत्रणात आणली आहे. आज सकाळी संपूर्ण बाजारात खरेदीसाठी लोकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली.
चेंबूरच्या भाजी मार्केटमध्ये आज सकाळी तुरळक प्रमाणात गर्दी - mumbai
काल संपूर्ण राज्यभरात प्रशासनाने नवीन कोरोना निर्बंध लावले होते. त्याच पार्श्वभूमीवर ती आज मुंबईतील दादर येथे जास्त तर चेंबूरला कमी गर्दी पाहण्यास मिळाली. यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
राज्यभरात तसेच मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत चालले आहेत. त्यामुळे प्रशासनाने राज्यभर कडक निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊन न लावता कडक निर्बंधांचे सगळ्या लोकांनी पालन करावे, असे राज्य सरकारने काल आपल्या परिपत्रकात नमूद केले आहे. सकाळची जमावबंदी तर रात्रीची नाईट कर्फ्यू अशी संकल्पना करत "ब्रेक द चेन" नावाची एक नवीन संकल्पना शासनाने राज्यभरात राबवण्याचे ठरवले आहे. परंतु, राज्यातील लोक आणि मुंबईतील जनताही या संपूर्ण धोरणाला कशा पद्धतीने पाठिंबा देतात, हे पाहणे खरे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असताना मुंबईमध्ये अंधेरी, चेंबूर यासारखे परिसर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. या परिसरातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने विशेष यंत्रणा कामाला लावली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर चेंबूर परिसरातही पालिकेने विशेष मोहीम राबवली आहे. त्या अंतर्गत चेंबूरच्या भाजी मंडईत लोकांची गर्दीही कमी प्रमाणात पाहायला मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये चेंबूरमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी होणार आहे का हे पाहणे आता महत्त्वाचा ठरेल.